सप्तर्षींच्या आज्ञेने बनवलेल्या सनातनच्या तीन गुरूंच्या चित्राविषयी साधकांना आलेल्या अनुभूती आणि लक्षात आलेला भावार्थ
‘१.८.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक’ प्रसिद्ध झाला होता. यातील पृष्ठ क्रमांक १ वरील सप्तर्षींच्या आज्ञेने प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या बनवलेल्या चित्राकडे पाहून साधकांना आलेल्या अनुभूती आणि सुचलेला भावार्थ येथे देत आहोत.
१. कु. शकुंतला कृष्णा दहिवलकर, सावर्डा, चिपळूण, रत्नागिरी.
अ. चित्राच्या वरच्या भागात स्पर्श केल्यावर मला उष्णता जाणवली.
आ. चित्राच्या मध्यभागी स्पर्श केल्यावर मला पाण्याचे बुडबुडे जाणवले.
इ. चित्राच्या खालच्या भागात स्पर्श केल्यावर मला उष्णता आणि पाण्याचे बुडबुडे जाणवले.
मला या अनुभूती दिल्याबद्दल मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’ (२.८.२०२१)
२. श्री. नंदकिशोर दत्तात्रेय नारकर (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राच्या वर उजव्या बाजूला प्रभु श्रीराम आणि डाव्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहे. याचा अर्थ सर्व देवता परात्पर गुरु डॉक्टरांना चैतन्य प्रदान करत आहेत. (‘अनेकातून एकात’, या साधनेच्या सिद्धांताप्रमाणे)
आ. परात्पर गुरु डॉक्टर साधकांना चैतन्य आणि सात्त्विकता प्रदान करत आहेत (एकातून अनेकात याप्रमाणे), म्हणजे साधक एकाच वेळी अनेक सेवा (आघाड्या) करू शकतात.
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधकांना सेवा करण्यासाठी चैतन्य प्रदान करणार आहेत, तर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साधकांना त्रास देणार्या अनिष्ट शक्तींपासून साधकांचे रक्षण करणार आहेत.
‘गुरुदेवांनी सूक्ष्मातून मला या चित्राचा अर्थ समजावून सांगितला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’ (१४.८.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |