सायंकाळचे जेवण सूर्यास्तापूर्वी अथवा त्यानंतर लवकरात लवकर का करावे ?
१. ‘सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण केल्याने अन्न पचनासाठी सूर्याकडून ऊर्जा मिळते.
२. अन्न पचन होण्यासाठी पुरेसा कालावधी मिळतो.
३. सायंकाळी घेतलेल्या आहाराचे दुसर्या दिवशी सकाळपर्यंत पूर्णतः पचन होते. परिणामी मल प्रवर्तन योग्य वेळी होण्यासाठी साहाय्यक ठरते.
४. ज्यांना सकाळी न्याहारी घ्यायची असते, त्यांना आदल्या दिवशीचे जेवण आणि सकाळची न्याहरी यांमध्ये आवश्यक वेळ मिळतो. परिणामी त्यांना सकाळी भूकेची व्यवस्थित जाणीव होते. ‘केवळ वेळ झाली म्हणून खाणे उरकणे’ किंवा ‘एक कृती करायची म्हणून करणे’, असे न होता ते सुखाने मनसोक्त न्याहारी करू शकतात.’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१४.१२.२०२२)
(संपर्कासाठी ई-मेल : drsameerparanjape@gmail.com)