(म्हणे) ‘कट्टर हिंदुत्वामुळे भारताचा सामाजिक ढाचा नष्ट होत आहे !’
पाकच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांची गरळओक !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत पाकिस्तानकडे लक्ष देऊन तो स्वतःच्या विकासाकडे दुर्लक्ष करत आहे. कट्टर हिंदुत्वामुळे भारताचा सामाजिक ढाचा नष्ट होत आहे, अशी टीका पाकच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पाकला ‘फ्रँकस्टीन राक्षस’ (एक काल्पनिक राक्षस) संबोधले होते. त्यावर खार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हिना रब्बानी खार यांनी पुढे म्हटले की, पाकला मुत्सद्देगिरीद्वारे अपकीर्त करण्यासाठी आणि त्याला वेगळे पाडण्याचा प्रयत्न करण्यात भारतीय नेते पंडित बनले आहेत.
संपादकीय भूमिका
|