हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ११ एप्रिलला सुनावणी होणार !
मुंबई – कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यामध्ये अपव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ११ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत मुश्रीफ यांना अटकेपासून दिलेले संरक्षण कायम असणार आहे. न्यायमूर्ती एम्.जी देशपांडे यांच्या न्यायालयात या प्रकरणावर निर्णय देण्यात येणार आहे.