मुंबई, ठाणे, रायगड येथे हनुमान जयंतीनिमित्त गदापूजन !
मुंबई – हनुमान जयंतीनिमित्त मुंबईत घाटकोपर, चेंबूर, गोरेगाव आणि नवी मुंबईत सानपाडा आणि आंग्रोळी गाव येथे गदा पूजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात वावे येथे, तर ठाण्यामध्ये पिंपळपाडा आणि नालासोपारा येथे गदापूजन करण्यात आले.
आंग्रोळी गावातील मंदिरात लावलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांनी भेट दिली. सानपाडा येथील ग्रंथप्रदर्शनाला तुर्भे येथील नगरसेविका सौ. शुभांगी पाटील यांनी भेट दिली.