सरपंच गोपाळे हत्या प्रकरणी ७ जण कह्यात !
पुणे – शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या हत्येच्या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी ३ जणांना कह्यात घेतले. त्यामुळे एकूण आरोपींची संख्या ७ झाली आहे. यातील चौघांना ६ एप्रिलपर्यंत, तर उर्वरित तिघांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. स्थानिक वादातून सरपंच गोपाळे यांची हत्या केल्याचा संशय त्यांचे भाऊ रवींद्र यांनी व्यक्त केला होता; मात्र पोलीस अन्वेषणात नेमके कारण समोर आले नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ पुढील अन्वेषण करत आहेत.