गृहस्थी जीवन म्हणजे घरसंसार, हे ईश्वराने दिलेले दायित्व समजावे !
‘जर तुम्ही गृहस्थी जीवन म्हणजे घरसंसार स्वीकारला असेल, विवाह करून एका परिवारात रहात असाल, तर याला असे समजू नका की, तुम्ही केवळ एका सामाजिक परंपरेचे पालन करत आहात किंवा तुमचा घरसंसार हा कुटुंबियांच्या निर्णयाचा परिणाम आहे. जर आपल्या घरसंसाराकडे या दृष्टीकोनातून पाहिले, तर त्यात येणार्या अडचणींचे तुम्ही कधी निदान (आणि त्यावर मात) करू शकणार नाही. ही गोष्ट तर निश्चित आहे की, आज ९० टक्क्यांपेक्षा अधिक कुटुंबांत कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचा ताण हा असतोच. पूर्वीच्या काळी घरसंसारात अडचणी असायच्या; परंतु आज या समस्या एका वेगळ्या प्रकारे वाढत चालल्या आहेत. तंत्रज्ञान (टेक्नॉलाजी) आणि शिक्षण या दोन्हीमुळे घरसंसाराला काही प्रमाणात हानी पोचवली आहे; परंतु हे सर्व तंत्रज्ञ अन् शिक्षण असू नये, असे सुद्धा समजू नका. या दोन्ही गाेष्टी असणे आवश्यक आहे; परंतु या दोन्ही कारणांमुळे तुमच्या घरात एखादी समस्या, काही ताण निर्माण झाला असेल, तर आपल्या घरसंसाराकडे अशा दृष्टीने पहा की, प्रत्यक्ष परमात्म्यानेच हे दायित्व पार पाडण्यासाठी आपली निवड केली आहे.
तुम्हाला ‘कुठली ना कुठली तरी कौटुंबिक समस्या ही परमात्म्याने दिलेले एक दायित्व आहे’, असे समजावे लागेल. जर हे समजून घेतले नाही, तर गुंतागुंत वाढत जाईल. आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचा अहंकार संपूर्ण घराला कलहरूपी नरक बनवेल. ‘तुम्ही आपल्या घरसंसाराचे मालक आहात, घरसंसाराचे नेतृत्व करत आहात’, असे मानून घरसंसार चालवा. घरसंसाराच्या मालकाला दुःखी होण्याचा अधिकार नसतो. त्याने घराचा स्वामी असल्याप्रमाणे घरसंसार चालवावा. एका छताखाली अनेक विचारांचे लोक एकत्र असतील, तर भिन्न भिन्न मतांच्या समस्यांमुळे त्रासून जाऊ नका. ‘ईश्वराच्या प्रीतीचा आदर्श समोर ठेवून सर्वांना प्रेमाने सामावून घ्या आणि त्यांना समजून घ्या अन् त्याने तुम्हाला दिलेले हे ईश्वरी दायित्व आहे’, असे समजून ते प्रेमानेच निभावून न्यावे. मग बघा, गृहस्थी म्हणजे घरसंसार तुम्हाला कधी तुमच्यावर एक लादलेले ओझे आहे, असे जाणवणार नाही.’
(साभार : मासिक, ‘अक्षर प्रभात’, ऑक्टोबर २०१९)
‘चीनमध्ये भ्रष्टाचार अल्प आणि प्रामाणिक लोक अधिक आहेत. व्यावसायिकांनी केवळ भारतातच रहावे आणि भारतातच सर्व काही करावे, असे वाटत असेल, तर व्यवसायाच्या संदर्भात निर्णय जलद घेतले जावेत.’ – एन्.आर्. नारायण मूर्ती, सहसंस्थापक, ‘इन्फोसिस’ आस्थापन (२७.२.२०२३) |