प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना अटक आणि सुटका !

हनुमान जयंतीच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी म्हणून केली अटक !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांची अटक आणि सुटका

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी ६ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अटक करण्यात आली. त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात येणार्‍या हिंदूंच्या संघटनांच्या मिरवणुकीत टी. राजा सिंह सहभागी होणार होते. यात ते कथित आक्षेपार्ह विधाने करतील, या कारणाने त्यांना पोलिसांनी अटक केली होती.

१. अटकेविषयी ट्वीट करून माहिती देतांना टी. राजा सिंह यांनी सांगितले की, मी प्रतिवर्षाप्रमाणे माझ्या मतदारसंघातील श्रीराममंदिर गौलीगुडा चमन येथील हनुमान जयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार होतो; मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी मला अटक केली. मी एक हिंदु म्हणून सरकार आणि पोलीस यांना विचारू इच्छितो की, माझ्या मतदारसंघातील भगवान हनुमानाच्या मिरवणुकीत मी सहभागी होऊ शकत नाही का ?

२. श्रीरामनवमीच्या वेळी येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये टी. राजा सिंह यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मशिदींवरून धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण केले जाते म्हणून कधी धर्मांधांना पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अटक केल्याचे ऐकले आहे का ? पोलीस जर असे तत्परत असते, तर हिंदूंच्या मिरवणुकांवर एकही आक्रमण झाले नसते; मात्र देशात हिंदूंना तुच्छ लेखण्यात येत असल्याने पोलीस हिंदूंच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !