‘सिंहगड एक्सप्रेस’मध्ये महिलांची छेड काढणार्या मदरशा शिक्षकाला अटक
पुणे – शहरातून मुंबईला जाणार्या ‘सिंहगड एक्सप्रेस’ गाडीत महिलांचे, अल्पवयीन मुलींचे भ्रमणभाषवर ‘व्हिडिओ शूटिंग’ करून छेड काढणार्या महंमद अश्रफ याला प्रवाशांनी रंगेहाथ पकडले. गेल्या काही दिवसांपासून अश्रफ असे प्रकार करत होता. ‘व्हिडिओ’ काढताना रंगेहात पकडल्यानंतर प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला. अश्रफ हा बिहारमधील सितामढीत रहात असल्याची माहिती समोर आली आहे. तो मदरशामध्ये शिक्षक आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगासह पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे.
सिंहगड एक्स्प्रेसमध्ये संतापजनक प्रकार, व्हिडिओ शूटिंग करत महिलांची छेड, प्रवाशांनी दिला चोप; आरोपी मदरशामधील शिक्षक https://t.co/1B8JOZOAzF #punenews #sinhgadexpress
— ABP माझा (@abpmajhatv) April 6, 2023
संपादकीय भूमिका‘असा वासनांध शिक्षक मदरशामध्ये काय शिकवत असेल ?’, याचा विचारच न केलेला बरा. मदरशांमध्ये असे वासनांध शिक्षक शिकवत असल्यामुळेच तेथे विद्यार्थिनींवर बलात्कार, विद्यार्थ्यांचे अनैसर्गिक लैंगिक शोषण झाल्याच्याही अनेक घटना घडलेल्या आहेत. अशा शिक्षकांना कठोर शिक्षाच हवी ! |