उत्तराखंडमध्ये इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आई आणि बाबा यांचा ‘अम्मी’ अन् ‘अब्बू’ असा मुसलमानांप्रमाणे उल्लेख !
तक्रारीनंतर अकादमीकडून परीक्षण करण्याचे आश्वासन !
डेहराडून (उत्तराखंड) – इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ (आय.सी.एस्.ई.) या मंडळाच्या इयत्ता दुसरीच्या इंग्रजी पुस्तकातील एका धड्यात आई आणि बाबा यांचा उल्लेख ‘अम्मी’ अन् ‘अब्बू’ असा मुसलमान धर्माप्रमाणे करण्यात आला आहे. यामुळे एका विद्यार्थ्याचे पालक मनीष मित्तल यांनी याविषयी जिल्ह्याधिकार्यांकडे तक्रार करत हा धडा हटवण्याची किंवा त्या ठिकाणी इंग्रजी भाषेप्रमाणे ‘मदर’ आणि ‘फादर’ असा उल्लेख करण्याची मागणी केली. यावरून जिल्हाधिकार्यांनी चौकशीचा आदेश दिला आहे.
#उत्तराखंड में अचानक मम्मी पापा की जगह छात्र कहने लगा अब्बू-अम्मी, किताब को लेकर विवाद शुरू @pushkardhami @dmdehradun #Uttarakhand #gulmohar https://t.co/lXnXhuXf5Q
— ETVBharat Uttarakhand (@ETVBharatUK) April 5, 2023
यानंतर मुख्य शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार यांनी म्हटले आहे की, यात धड्यामध्ये एक गोष्ट असून त्यातील पात्र आमीर त्याच्या माता-पित्यांना त्याच्या धर्मानुसार अम्मी आणि अब्बू असे हाक मारतो. इयत्ता दुसरीच्याच गुलमोहर नावाच्या पुस्तकातील एका धड्यामध्ये मम्मी आणि पापा असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे याचे परीक्षण अकादमीकडून करण्यात येणार आहे.