देशभरातील खासगी शाळांनी १५ टक्के शुल्क वाढवले !
नवी देहली – देहली, कर्नाटक, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, काश्मीर, झारखंड या राज्यांसमवेत अनेक राज्यांतील खासगी शाळांनी १० ते १५ टक्के शुल्क वाढवले आहे. याला अनेक राज्यांतील पालकांनी विरोध केला आहे. अनेक खासगी शाळा या सरकारी भूमींवर बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारची अनुमती असल्याविना या शाळांचे व्यवस्थापन मनमानी पद्धतीने शुल्क वाढवू शकत नाहीत. असे असले, तरी मनमानी पद्धतीने शुल्क वाढवण्यात आले आहे. देहलीमध्ये १ सहस्र ७०० खासगी शाळात आहेत. त्यांतील सरकारी भूमींवर बांधण्यात आलेल्या शाळांची संख्या ३९४ आहे. काही खासगी शाळांना सरकारी अनुदान मिळत नाही. असे असले, तरी त्यांना शुल्क वाढवतांना सरकार दरबारी त्यांची माहिती देणे, तसेच शाळेच्या वार्षिक खर्चाचा ताळेबंद सरकारला सादर करणे आवश्यक आहे; मात्र बहुतांश खासगी शाळा असे करतांना दिसत नाहीत.