हल्द्वानी (उत्तराखंड) येथे ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंद

सामूहिक नमाजपठणावरील वादाचे प्रकरण

राष्ट्रीय महामार्ग अडवून वाहतुकीला अडथळा आणला. या प्रकरणी ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंद

नैनिताल (उत्तराखंड) – येथील हल्द्वानी शहरात अवैधपणे बांधलेल्या इमारतीत सामूहिक नमाजपठण करण्यावरून हिंदु आणि मुसलमान यांच्यात झालेल्या वादानंतर मुसलमान समुदायातील लोकांनी कोतवाली येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून वाहतुकीला अडथळा आणला. या प्रकरणी पोलिसांनी अनुमाने ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंदवले.

हल्द्वानी येथील एका अवैध इमारतीत सामूहिक नमाजपठणावर हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. या वेळी हिंदु संघटनेचे नेते आणि मुसलमान धर्मगुरू यांच्यात हाणामारी  झाली. याचा निषेध म्हणून धर्मगुरू जफर उल्ला सिद्दिकी आणि मौलाना शाहिद हुसेन यांच्या नेतृत्वाखाली मुसलमानांनी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी हिंदु नेत्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. या वेळी अनुमाने ७०० ते ८०० मुसलमानांनी कोतवाली येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून निदर्शने केली. याप्रसंगी पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले.