उदयपूर (राजस्थान) जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धार्मिक झेंडे लावण्यावर बंदी
उदयपूर (राजस्थान) – उदयपूरचे जिल्हाधिकारी ताराचंद मीणा यांनी जिल्ह्यात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी धार्मिक झेंडे लावण्यावर बंदी घातली आहे, तसेच जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. ही बंदी २ मासांसाठी असणार आहे. हनुमान जयंतीच्या आदल्या रात्री हा आदेश जारी करण्यात आला. जिल्हाधिकार्यांच्या आदेशामध्ये राजकीय इमारत, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पार्क, चौक, विद्युत् दिव्यांचे खांब, दूरभाष वायर्सचे खांब आदी ठिकाणी हे झेंडे लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
उदयपुर एक बार फिर से संवेदनशील स्थिति में आ गया है. यहां अब कोई भी सार्वजनिक स्थलों पर धार्मिक झंडे नहीं लगा पाएगा. #Udaipur #Rajasthan #ReligiousFlag @vipins_abphttps://t.co/ESjK5K5q1A
— ABP News (@ABPNews) April 6, 2023
संपादकीय भूमिका
|