गोवा : महिलेवर आक्रमण करण्याची ३ दिवसांतील दुसरी घटना
|
पणजी, ५ एप्रिल (वार्ता.) – हणजूण येथे एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करून तिला मारहाण करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २ संशयितांना कह्यात घेतले आहे. हणजूण येथील राज शिंदे (वय २८ वर्षे) आणि छत्तीसगड येथील नौमन सबेरी (वय २२ वर्षे) यांना कह्यात घेण्यात आले आहे. (परप्रांतीय गोव्यात कामानिमित्त येऊन येथे गुन्हेगारी कृत्ये आणि महिलांचा विनयभंग करत आहेत. सरकारने यावर त्वरित ठोस उपाययोजना काढणे आवश्यक ! या घटनांमुळे गोव्याचे नाव अपकीर्त होत आहे ! – संपादक)
Two arrested in molestation case https://t.co/yWVKuGQ761
— TOI Goa (@TOIGoaNews) April 5, 2023
हणजूण येथे एका दुकानात जात असतांना संशयितांनी संबंधित महिलेशी अयोग्य वर्तणूक केली आणि नंतर तिला मारहाण केली. ३ एप्रिल या दिवशी मडगाव येथेही मध्यरात्री एका महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली होती.