दात बळकट होण्यासाठी आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ उपाय
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १७७
तैलगण्डूषाभ्यासः दन्तबलरुचिकरणाम् श्रेष्ठः। – चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय २५, श्लोक ४०
अर्थ : दात बळकट होण्यासाठी, तसेच तोंडाला चव येण्यासाठी प्रतिदिन नियमितपणे ‘तैल गंडूष’ करणे सर्वश्रेष्ठ आहे.
‘सकाळी उठून दात घासून झाल्यावर चमचाभर तिळाचे तेल कोमट करून तोंडात धरून ठेवावे. तोंड लाळेने भरल्यावर ते थुंकून टाकावे. यानंतर कोमट पाण्याने चूळ भरून टाकावी. याला ‘तैल गंडूष’ असे म्हणतात. असे प्रतिदिन नियमित केल्यास दात बळकट होतात, तसेच तोंडाला चव येते. (तेल कोमट करण्यासाठी तेलाची बाटली थोडा वेळ कोमट पाण्यात ठेवावी.)’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.३.२०२३)
आतापर्यंतचे सर्व लेख वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकवर क्लिक करा ! |