हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना
नवी देहली – उद्या, ६ एप्रिल या दिवशी असणार्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने केंद्रशासनाच्या गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सूचना जारी केल्या आहेत. राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवावी, सण शांततेत साजरा करावा आणि समाजामध्ये धार्मिक सद्भाव बिघडवणार्यांवर लक्ष ठेवावे, असे यात म्हटले आहे.
हनुमान जयंती को लेकर केंद्र ने सभी राज्यों के लिए जारी की एडवाइजरी#MHAadvisory #hanumanjayanti#HanumanJayantidvisory #MHAhttps://t.co/2BKknqcCA5
— India TV Hindi (@IndiaTVHindi) April 5, 2023
रामनवमीच्या वेळी बिहार, बंगाल या राज्यांसहित ७ राज्यांत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.