रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !
अ. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहातांना जाणवलेली सूत्रे : ‘आश्रमातील स्वागतकक्षात असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहातांना मला त्याच्या मुखकमलावर परम आनंद आणि शांती जाणवली. भारताला वाचवण्यासाठी आणि रामराज्याच्या स्थापनेसाठी श्रीकृष्णामध्ये सूक्ष्म आणि अनंत शक्ती असल्याचे जाणवले.
आ. आश्रमात मला शांतता जाणवली. येथील साधकांमध्ये सेवाभाव आणि प्रामाणिकपणा जाणवला. येथे सर्वत्र स्वच्छता असल्याने ईश्वरी चैतन्य जाणवले. सर्व साधकांची साधनेत प्रगती होत असल्याचा भाव त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. आश्रमात राहून नामजप केल्याने आध्यात्मिक पातळी आणि येणार्या अनुभूती यांत वृद्धी होते.’
इ. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय !
१. अनिष्ट शक्तींवर मात करण्यासाठी सजीव-निर्जीव, अशा सर्वांच्या संघर्षाचे हे एक स्पष्ट उदाहरण आहे. आदरणीय डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन आणि कृपा यांमुळेच अनिष्ट शक्तींचा त्रास दूर होऊन आध्यात्मिक उन्नती होत आहे, हे स्पष्ट आहे.’
– श्री. गणेश राधाकृष्णन्, चेन्नई, तमिळनाडू.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |