सतत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती !
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय !
मुंबई – सतत पडणारा पाऊस म्हणजे नैसर्गिक आपत्ती समजली जाईल, असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस सलग ५ दिवस पडल्यास ती नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. हा राज्य सरकारचा शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्वांत मोठा निर्णय आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकर्यांना तातडीने साहाय्य मिळू शकेल.
मंत्रीमंडळातील इतर महत्त्वाचे निर्णय
१. ग्राहकांना स्वस्त दरात वाळू आणि रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता देणार, तसेच रेती लिलाव बंद करण्यात येईल.
२. ‘नागपूर मेट्रो रेल टप्पा-२’च्या प्रकल्पास सुधारित मान्यता, ४३.८० कि.मी.चा मेट्रो मार्ग उभारणार
३. देवनार डम्पिंग मैदानावर कचर्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल
४. अतीविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक संवर्गातील १४ पदे निर्माण करणार
५. महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी
६. अकृषी विद्यापिठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता
७. ‘नॅक’, ‘एन्.बी.ए.’ मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ‘परिस स्पर्श’ योजना