सातार्यात पोल्ट्रीमध्ये चालू असणार्या पशूवधगृहावर पोलिसांची धाड !
४२ गायींची सुटका, ३० वासरांचे मांस हस्तगत
सातारा, ५ एप्रिल (वार्ता.) – फलटण तालुक्यातील मौजे मिरगाव येथे एका पोल्ट्रीमध्ये चालू असलेल्या पशूवधगृहावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये ४२ जिवंत गायी, वासरे आणि अनुमाने ३० वासरांचे मांस, पायाची खुरे, डोके, सोलून काढलेली कातडी आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून घटनास्थळावरून ६ लाख १६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.
मिरगाव येथील पोल्ट्रीफार्मवर जर्सी होस्टन गायी आणि वासरे कत्तल करण्यासाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने पोल्ट्रीकडे धाव घेतली; मात्र पोलीस येत असल्याचे कळताच तेथे उपस्थित कामगार पळून गेले. या वेळी पोलिसांना गायी, वासरे आणि वासरांचे मांस आढळून आले. पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. फाळके यांच्याकडून त्वरित मांसाची आणि मृत वासरांची पडताळणी करून घेण्यात आली. पोल्ट्रीविषयी चौकशी केली असता ही पोल्ट्री मिरगावातीलच सोपान सुळ यांची आहे. पोलिसांनी सुळ यांना कह्यात घेऊन चौकशी केली असता सुळ यांनी ही पोल्ट्री शब्बीर शेख यांना भाडेतत्त्वावर चालवण्यास दिल्याचे सांगितले. पोलिसांनी सुळ आणि शेख यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. (‘जेथे धर्मांध, तेथे गोवंशियांची कत्तल’, असे समीकरणच झाले आहे. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी ! – संपादक)