एक निर्विवाद सत्य !
सध्या युक्रेनमधील २० लाख नागरिक रशिया-युक्रेन युद्धामुळे सर्व काही मागे ठेवून इतर देशांमध्ये आश्रय घेत आहेत. त्यांच्या शेजारच्या देशांनी त्यांना आश्रय दिला, हे त्यांचे भाग्य आहे. भारतात हिंदूंनी विचार करण्याची वेळ आलेली आहे की, हीच परिस्थिती जर उद्या भारतावर आली, तर आमचे काय होणार ?
एका बाजूला पाकिस्तान, दुसर्या बाजूला बांगलादेश, खाली हिंदी महासागर, वर चीन, देशाच्या आत असंख्य गद्दार (देशद्रोही), हे लक्षात घेता आम्हा हिंदूंना आश्रय देण्यासाठी दुसरा कोणताही देश नाही, हे उघड सत्य आहे.
मी, माझा पैसा, माझी संपत्ती, माझी प्रतिष्ठा हे सर्व काही सुरक्षित आहे, तोपर्यंत माझा देश सुरक्षित आहे. युक्रेनच्या नागरिकांची सद्यःपरिस्थिती पहाता सर्व हिंदूंनी आता एकजुटीने आपल्या देशाचे म्हणजेच आपले रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा आपली अवस्था भयानक होईल. हे सांगण्यासाठी कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. स्वस्त पेट्रोल आणि विनामूल्य रेशन, राखीव जागा यांमध्ये न अडकता सशक्त राष्ट्राला प्राधान्य देणे, हीच आता काळाची आवश्यकता आहे.
– श्री. नारायण नाडकर्णी, खडपाबांध, फोंडा, गोवा.