स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचे पाप भारतीय सहन करणार नाहीत ! – आमदार मदन येरावर, यवतमाळ
यवतमाळ येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’चे आयोजन !
यवतमाळ, ५ एप्रिल (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी केलेले कार्य बहुमूल्य आहे, देश स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी यातना सहन केल्या. अंदमान कारागृहात त्यांना शिळे आणि अळ्या असलेले अन्न मिळायचे, तरीही त्यांनी राष्ट्रकार्य चालू ठेवले. असे असतांना वारंवार त्यांचा अपमान केला जातो; मात्र आता त्यांचा अपमान करण्याचे पाप भारतीय सहन करणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार मदन येरावर यांनी दिली. येथील ‘सावरकर गौरव यात्रे’च्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. ‘ सावरकर विचार मंचा’चे श्री. सतपाल सोहळे म्हणाले, ‘‘सावरकरांचा अपमान करणार्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो.’’