रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात असलेल्या हनुमानाच्या मूर्तीच्या संदर्भात सौ. रिशिता गडोया यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे रामनाथी आश्रमात हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या हनुमानाच्या मूर्तीत इतका जिवंतपणा आहे की, हनुमान प्रत्यक्ष तेथे असल्याचा मला भास होतो. हनुमानाला प्रार्थना करतांना ‘हनुमान विराट रूपात रामराज्याच्या स्थापनेसाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपातील श्रीरामाची सेवा करण्यासाठी सज्ज आहे’, असे मला जाणवते. मूर्तीच्या परिसरात शांतीची अनुभूती येते आणि ‘मी पृथ्वीवर नसून एका अत्यंत सात्त्विक प्रदेशात आले आहे’, असे वाटते.
परात्पर गुरु डॉक्टर आम्हा साधकांसाठी जे करत आहेत, त्याबद्दल त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. त्यांच्या कृपेविना आपल्याला यातील काहीच अनुभवता आले नसते.’
– सौ. रिशिता गडोया, फोंडा, गोवा. (२६.५.२०२१)