तळगाव (मालवण जि. सिंधुदुर्ग) येथे होणार्या गावठी मद्याच्या अवैध विक्रीवर तात्काळ कारवाई करा !
|
मालवण – तालुक्यातील तळगावच्या सीमेवर अवैधरित्या गावठी मद्याची विक्री केली जात आहे. यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याविषयी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक, तालुक्यातील कट्टा येथील पोलीस दूरक्षेत्र, तळगाव सरपंच आणि ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले.
विषारी मद्यामुळे अनेकांचे बळी गेल्याच्या घटना यापूर्वी अनेक ठिकाणी घडल्या आहेत. तळगाव येथेही तसे होण्याची शक्यता आहे. मद्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे गावातील अवैध मद्यविक्रीवर कारवाई करून गाव मद्यमुक्त करा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|