माझे आजोबा वर ७२ अप्सरांसमवेत व्यस्त असणार !

पाकिस्तानच्या प्रसिद्ध महिला पत्रकार आरजू काझमी यांनी टीकाकारांना फटकारले !

पत्रकार आरजू काझमी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील प्रसिद्ध महिला पत्रकार आरजू काझमी यांनी २ दिवसांपूर्वी ट्वीट करून त्यांच्या आजोबांनी फाळणीच्या वेळी भारतातून पाकमध्ये येण्याची चूक केली होती, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यावर पाकमध्ये मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच त्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. यात एका व्यक्तीने ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या आजोबांच्या आत्म्याला काय वाटत असेल ?’ असे म्हटले. त्यावर आरजू काझमी यांनी ‘इस्लाममध्ये आम्हाला सांगितले गेले आहे की, मृत्यूनंतर ७२ अप्सरा मिळतात. त्यामुळे आजोबा या अप्सरांसमवेत व्यस्त असणार. त्यांना आमच्याकडे पहाण्यास वेळच नसणार की, आम्ही येथे काय करत आहोत’, असे परखड उत्तर दिले आहे. याविषयी काझमी यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

आरजू काझमी पुढे म्हणाल्या की, पाकमध्ये येऊन चूक झाली, हा माझे वैयक्तिक विचार आहे; कारण माझे दोन्ही भाऊ युरोपमध्ये स्थायिक झाले आहेत. पाकमध्ये त्यांना कोणतेही भविष्य नव्हते. हेच जर मी म्हटले, तर इतका वाद का होत आहे ? हे माझ्या लक्षात येत नाही. हळूहळू या गोष्टीची प्रत्येकाला सवय होईल. मी असेच बोलत असते, मग कुणाला ते आवडो अगर न आवडो.