पंतप्रधान मोदी यांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही ! – गुलाम नबी आझाद
नवी देहली – मी अनेक सूत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध केला; पण त्यांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही, असे मत काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले. डेमोक्रॅटिक आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांच्या आत्मचरित्राचे काँग्रेसचे नेते करण सिंह यांच्या हस्ते ५ एप्रिलला प्रकाशन झाले आहे. तत्पूर्वी आझाद यांनी वृत्तवाहिनीशी संवाद साधतांना पंतप्रधान मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.
#GhulamNabiAzad also called PM #NarendraModi ‘too generous’https://t.co/meK0pFKAoh
— Zee News English (@ZeeNewsEnglish) April 5, 2023
गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ५० वर्षांचे राजकीय अनुभव आणि अनेक घटना यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्यांनी त्यांचे जुने सहकारी जयराम रमेश आणि सलमान खुर्शीद यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.