श्रीलंका रामायणातील घडामोडींची साक्ष देणार्या स्थळांचा विकास करणार !
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंका रामायणातील घडमोडींची साक्ष देणार्या स्थळांचा विकास करणार आहे. सीतामातेच्या अस्तिवाची साक्ष देणार्या स्थळांचीही स्वतंत्र पहाणी करण्यात येत आहे. यामध्ये सिगिरिया, अशोक वाटिका, दिवुरुमपोला मंदिर यांसारख्या अनेक स्थळांचा समावेश आहे. त्रिंकोमाली या प्रसिद्ध बेटावर रामयणाशी संबंधित अनेक मंदिरे आहेत. या बेटावर आर्थिक व्यवहार करण्यासाठी भारतीय चालनाला (रुपयाला) अनुमती देण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
सिगिरिया – रावणाचा राजवाडा !
श्रीलंकेतील काही लोकप्रिय स्थळांमध्ये सिगिरिया, म्हणजे रावणाचा राजवाडा मानला जाणार्या प्राचीन दगडी किल्ल्याचा समावेश आहे.
अशोक वाटिका !
अशोक वाटिका, नुवारा एलिया शहरातील बाग, हे आणखी एक लोकप्रिय स्थळ आहे. असे मानले जाते की, याच ठिकाणी रावणाने सीतेला बंदिवासात ठेवले होते. हनुमान येथे सीतेला भेटले आणि तिला प्रभु श्रीरामाची अंगठी दिली होती.
रावण एला फॉल्स आणि दिवुरुमपोला मंदिर !
या सूचीत रावण एला फॉल्स या स्थळाचाही समावेश आहे. ‘सीतेला पळवून नेल्यानंतर रावणाने तिला या ठिकाणी लपवले होते’, असे मानले जाते. दिवुरुमपोला मंदिर, हे बंदरवेला शहराजवळील एक मंदिर आहे. असे मानले जाते की, येथे सीतामातेची पवित्रता सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा घेण्यात आली होती.
त्रिंकोमालीमधील कोनेश्वरम मंदिर !
‘त्रिंकोमाली या शहरात असलेले कोनेश्वरम् मंदिर हे श्रीरामाने भगवान शिवाच्या सन्मानार्थ बांधले होते’, असे मानले जाते.
संपादकीय भूमिकाकुठे रामायणाशी निगडीत स्थळांचा विकास करणारा श्रीलंका, तर कुठे श्रीरामाला काल्पनिक ठरवून रामसेतू तोडायला निघालेले हिंदुद्वेषी तत्कालीन काँग्रेस सरकार ! |