गडहिंग्लज शहरासाठी ४६ कोटी ६० लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना संमत !
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – भारत सरकारपुरस्कृत ‘अमृत मिशन २’अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ‘हर घर नल, हर घर जल’ या धोरणानुसार गडहिंग्लज शहरासाठी भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने ४६ कोटी ६० लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना संमत केली आहे. या योजनेमुळे प्रत्येक घरासाठी पाणी देणे शक्य होणार आहे.