मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून ९ मासांत ६ सहस्र २०० जणांना अर्थसाहाय्य !
मुंबई – नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ९ मासांत राज्यातील ६ सहस्र २०० नागरिकांना ५० कोटी ५५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाद्वारे देण्यात आली आहे. यानुसार प्रतिमास ६८८ जणांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साहाय्य करतांना ‘राज्यातील एकही सर्वसामान्य गोरगरीब रुग्ण पैशाअभावी उपचाराविना रहाणार नाही’, याची काळजी घेऊन साहाय्य करावे, अशी सूचना दिली असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाद्वारे सांगण्यात आले.