आज सांगली येथील ‘सावरकर गौरव यात्रे’त सहभागी होण्याचे आवाहन !
सांगली, ४ एप्रिल (वार्ता.) – येथे ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ वाजता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक (स्टेशन चौक) येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भाजप, शिवसेना, मित्र पक्ष, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सावरकरप्रेमी यांच्या वतीने ‘भव्य सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले. येथील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी शहर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक बाबा शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार हेतूपूर्वक अपमान करणारे राहुल गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते यांचा निषेध केला. माजी आमदार नितीन राजे शिंदे यांनी सावरकरांच्या लढवय्या हिंदुत्वाच्या कार्याचा उल्लेख करत सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या गौरव यात्रेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन केले.