गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे अज्ञातांकडून श्रीगणेशाच्या मूर्तीची तोडफोड !
गुंटूर (आंध्रप्रदेश) – येथील फिरंगीपूरमध्ये असणार्या हाऊस गणेश नावाच्या गावामधील श्री गणेश मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीची अज्ञातांकडून ३ एप्रिलच्या रात्री तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी चालू केली असून अद्याप आरोपींविषयी माहिती मिळू शकलेली नाही.
Ancient Ganesh idol vandalised by unidentified persons in Andhra Pradeshhttps://t.co/MgfkBkPmGG
— TheNewsMinute (@thenewsminute) April 4, 2023
आरोपींनी मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीचे अनेक तुकडे केले. यामुळे येथे हिंदूंमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी हिंदूंना संयम बाळगण्यास सांगितले आहे. (हिंदू नेहमीच संयम बाळगतात, तर धर्मांध त्यांच्या धर्मग्रंथांची जाळपोळ झाल्याची अफवा पसरली, तरी दंगली घडवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) यासह पोलिसांनी ‘आरोपींना लवकरच अटक करू’, असे आश्वासन दिले आहे. (राजकारण्यांप्रमाणे आश्वासन देऊन लोकांना वाटेला लावणारे पोलीस ! – संपादक) मंदिरात नवीन मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे.
हिंदूंच्या मंदिरांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत असतांना कारवाई होत नाही ! – भाजप
भाजपचे नेते सुनील देवधर यांनी आरोप केला की, राज्यातील सरकारच्या काळात हिंदूंच्या मंदिरांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे; मात्र या प्रकरणांत कुणालाही अटक झालेली नाही. राज्यात वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकार हिंदुविरोधी असल्यानेच असे घडत आहे.
संपादकीय भूमिकाआंध्रप्रदेशात सातत्याने हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केले जात असतांना राज्यातील ख्रिस्ती मुख्यमंत्री असलेल्या वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकारकडून कारवाई होतांना दिसत नाही, याविषयी स्वतःला कायदाप्रेमी, राज्यघटनेचे रक्षक म्हणवून घेणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |