राज्यात पुन्हा वादळी वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता !
मुंबई – राज्यात ७, ८ आणि ९ एप्रिल या दिवशी वादळी वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा, तसेच विदर्भातील अनेक शेतकर्यांच्या रब्बी पिकांची काढणी अजून बाकी आहे, तर अनेक शेतकर्यांची हळद, मका, कांदा या पिकांची काढणीही चालू आहे. शेतकर्यांनी ५ एप्रिलच्या आधी सर्व पिकांची काढणी करून घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
राज्यामध्ये नगर, लातूर, धाराशिव, नांदेड, संभाजीनगर, परभणी, जळगाव, बुलढाणा, जालना, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या दृष्टीने दक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.