राहुल गांधी यांना शिक्षेच्या प्रकरणी जामीन संमत
१३ एप्रिलला शिक्षा रहित करण्याविषयी होणार सुनावणी
सुरत (गुजरात) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वर्ष २०१९ मध्ये एका सभेत ‘मोदी आडनावेचे सगळे जण चोर असतात’, असे विधान केल्याच्या प्रकरणी त्यांना सुरत सत्र न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्या शिक्षेवर ३ एप्रिल या दिवशी न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन संमत केला. राहुल गांधी यांनी न्यायालयात उपस्थित राहून या शिक्षेला आव्हान देणारी याचिका प्रविष्ट केल्यानंतर त्यांना जामीन संमत करण्यात आला. या वेळी त्यांच्या समवेत त्यांची बहीण प्रियांका वाड्रा याही उपस्थित होत्या. गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर ३० दिवसांत आव्हान देण्याची समयमर्यादा देण्यात आली होती. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. त्या सुनावणीत जर राहुल गांधी यांची शिक्षा रहित करण्यात आली, तरच त्यांची रहित केलेली खासदारकी मागे घेतली जाऊ शकते.
सौजन्य : India Today