मुसलमान प्रियकराने हिंदु प्रेयसीला पेटवून स्वतःही जाळून घेतले : प्रियकराचा मृत्यू
बागलकोट (कर्नाटक) येथील घटना !
हिंदु तरुणीचे अन्यत्र लग्न ठरवल्याचे सहन न झाल्याने केले कृत्य !
बागलकोट (कर्नाटक) – प्रेयसी नेत्रावती हिला पेटवून दिल्यानंतर प्रियकर अफझल सोलापूर (वय २७ वर्षे) याने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुडुरू या गावात घडली. अफझल हा मोठ्या प्रमाणात भाजल्याने रुग्णालयात उपचार चालू असतांनाच याचा मृत्यू झाला. अफजल सोलापूर हा नेत्रावतीवर प्रेम करत होता; परंतु तिच्या कुटुंबियांनी तिचे लग्न ठरवल्याचे अफझल याला सहन न झाल्याने नेत्रवतीला जाळण्याचा प्रयत्न केला.
संपादकीय भूमिका
जो खरे प्रेम करतो, तो कधी असे कृत्य करू शकत नाही. याला प्रेम नाही, तर द्वेषच म्हणतात !