देवद (पनवेल) येथील आश्रमात आगमन झालेल्या दासमारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेतांना संत आणि साधक यांना आलेल्या अनुभूती !

चैत्र पौर्णिमेला (६ एप्रिल या दिवशी) हनुमान जयंती आहे. त्या निमित्ताने…..

७.१०.२०२१ या दिवशी देवद (पनवेल) येथील आश्रमात दासमारुतीच्या दगडी मूर्तीचे आगमन झाले. त्या मूर्तीत पुष्कळ दास्यभाव, प्रेमभाव आणि शक्ती जाणवत होती, तसेच ती मूर्ती सजीव जाणवत होती. त्या मूर्तीचे दर्शन घेतांना देवद आश्रमातील संत आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री दासमारुति

१. संतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१ अ. पू. रमेश गडकरी (सनातनचे १९ वे संत, वय ६५ वर्षे)

पू. रमेश गडकरी

१ अ १. ‘मारुतिराया प्रभु श्रीरामचंद्राच्या चरणांकडे पहात आहे’, असे जाणवणे : ‘मारुतीच्या मूर्तीकडे पाहिल्यावर माझे मन एकदम शांत झाले. मारुतीची दृष्टी खालच्या बाजूला झुकलेली होती. ती पाहून ‘जणू मारुतिराया प्रभु श्रीरामचंद्राच्या चरणांकडे पहात आहे’, असे जाणवत होते.

१ अ २. माझ्याकडून मारुतिरायाच्या चरणी ‘तुझ्यासारखा दास्यभाव माझ्यामध्ये येऊ दे’, अशी संपूर्ण शरणागतभावाने प्रार्थना झाली.’ (१०.१०.२०२१)

१ आ. पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार (सनातनच्या ६९ व्या संत, वय ३३ वर्षे)

पू. (सौ.) अश्विनी पवार

१ आ १. पू. (सौ.) अश्विनी पवार मारुतीच्या मूर्तीला नमस्कार करत असतांना त्यांचे छायाचित्र काढल्यावर त्यात ‘मारुति त्यांना आशीर्वाद देत आहे’, असे एक संत आणि साधक यांना जाणवणे : ‘मी मारुतीच्या मूर्तीला वाकून नमस्कार केला. एका साधकाने मी मारुतीला नमस्कार करत असतांनाचे छायाचित्र काढले. त्या छायाचित्रात ‘मारुति मला आशीर्वाद देत आहे’, असे दिसत होते. एक संत आणि छायाचित्र काढणारा साधक यांच्या हे लक्षात आले.

श्री दासमारुतीच्या चरणी शरणागतभावाने वंदन करतांना पू. (सौ.) अश्विनी पवार

१ आ २. मूर्ती सजीव जाणवणे : मारुतीची मूर्ती दास्यभावातील असून ‘प्रत्यक्ष मारुति तेथे बसला आहे’, असे मला जाणवले. ती मूर्ती पुष्कळ सजीव वाटत होती.

१ आ ३. मूर्तीमध्ये प्रीतीची स्पंदने जाणवणे : दास्यभावातील ती मारुतीची मूर्ती पाहून मला पुष्कळ आपलेपणा वाटला. ‘पूर्वीपासूनची ओळख असल्यावर जो आपलेपणा वाटतो’, तसा मला ती मूर्ती पाहून वाटला. त्या मूर्तीमध्ये मला प्रीतीची स्पंदने मोठ्या प्रमाणात जाणवली.’ (७.१०.२०२१)

२. साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ अ. सौ. अंजली झरकर

२ अ १. मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढल्यावर मारुतीच्या मूर्तीसमोर नामजपाला बसल्यावर त्याच्या नेत्रांची हालचाल जाणवणे आणि मारुतीचा दास्यभाव अनुभवता येऊन नामजप आपोआप चालू होणे : ‘मारुतीच्या मूर्तीचे देवद आश्रमात आगमन झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारी माझ्या मनातील विचारांचे प्रमाण वाढले होते. ‘मनात नकारात्मक विचार येण्यास चालू होणार’, असे मला जाणवत असतांना मी नामजपादी उपाय करण्यासाठी मारुतिरायाच्या मूर्तीसमोर बसले; पण मला नामजप करता येत नव्हता. मी मारुतिरायाच्या मूर्तीच्या नेत्रांकडे एकटक पहात होते. त्याच्याशी बोलण्यासाठी माझ्या मनात शब्दही येत नव्हते. काही वेळाने माझे मूर्तीच्या नमस्कार केलेल्या मुद्रेकडे लक्ष गेले. क्षणभर ‘मारुतिरायाचे नेत्र हलले’, असे मला जाणवले. मी पुन्हा मारुतीच्या नेत्रांकडे पाहिले. ‘मारुतिरायामध्ये पुष्कळ दास्यभाव आहे’, असे मी ऐकले होते; मात्र तो दास्यभाव आता मला प्रत्यक्ष अनुभवताही येत होता. हे अनुभवल्यावर मी डोळे बंद करून नामजप करण्याचा प्रयत्न केला आणि माझा नामजप चालू झाला.

२ अ २. ‘मारुतिराया प्रभु श्रीरामाच्या चरणी बसला आहे’, असे जाणवणे : काही वेळाने मी डोळे उघडले. तेव्हा ‘प्रभु श्रीराम आला आहे आणि त्याच्या जवळच मारुतिराया बसला आहे’, असे मला जाणवले. तेव्हा ‘आज आश्रमात केवळ मारुतिरायाच नाही, तर प्रभु श्रीरामही आला आहे’, असे मला जाणवले.

२ अ ३. श्रीरामाच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि मारुतीच्या जागी सद्गुरु राजेंद्र शिंदे दिसणे अन् मनोमन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे : त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी मी मारुतिरायाची मूर्ती ठेवलेल्या खोलीत नामजपाला बसले होते. तेव्हा मला पुष्कळ अस्वस्थ वाटत होते. मी मारुतिरायाकडे पहात असतांना मला क्षणभर तिथे सद्गुरु राजेंद्रदादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) दिसले आणि ‘त्यांच्या समोर विराट रूपात प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) उभी आहे’, असे जाणवले. ‘जसे त्रेतायुगात प्रभु श्रीराम आणि मारुतिराया होते, तसे या कलियुगात प.पू. गुरुमाऊली अन् सद्गुरु राजेंद्रदादा आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा माझ्याकडून प.पू. गुरुदेव आणि सद्गुरु राजेंद्रदादा यांना मनोमन प्रार्थना झाल्या अन् देवाने दर्शन दिले; म्हणून त्याच्या चरणी कृतज्ञताही व्यक्त झाली.’ (१०.१०.२०२१)

२ आ. श्री. प्रभाकर प्रभुदेसाई : ‘देवद आश्रमात हनुमानाच्या मूर्तीचे आगमन झाल्यावर मी दोन वेळा मारुतीची मूर्ती ठेवलेल्या खोलीत जाऊन तिचे दर्शन घेतले.

२ आ १. पहिल्या वेळी दर्शन घेतांना ‘मारुतीकडून प्रक्षेपित होणार्‍या शक्तीने खोली भरून गेली आहे’, असे जाणवणे : मारुतीची मूर्ती ठेवलेल्या खोलीत मला प्रचंड शक्ती जाणवली. ‘त्या शक्तीने संपूर्ण खोली भरून गेली आहे’, असे मला वाटले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘ही खोली शक्तीने भरून गेल्याने यापुढे या खोलीत साधक दिवसा नामजपासाठी बसू शकणार नाहीत आणि रात्री झोपूही शकणार नाहीत; कारण खोलीत तसा वावच (जागाच) नाही.’

२ आ २. दुसर्‍या वेळी मारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेतांना मारुतीचे बलाढ्य रूप दिसणे : दुसर्‍या वेळी मारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेतांना मला मारुतीचे बलाढ्य रूप दिसले. ‘त्या मूर्तीतील मारुति अतिशय निर्मळ मनाचा आहे’, असे जाणवून मला आनंद जाणवला.’ (१२.१०.२०२१)

२ इ. श्रीमती कमलिनी कुंडले

२ इ १. मारुतीच्या मूर्तीकडून शक्तीचा झोत अंगावर आल्याने मागे ढकलले गेल्याचे जाणवणे : ‘९.१०.२०२१ या दिवशी रात्री मला ‘देवद आश्रमात मारुतिरायाच्या मूर्तीचे आगमन झाले आहे’, असे कळले. मारुतीची मूर्ती ठेवलेल्या खोलीत दर्शनासाठी पाऊल ठेवताच मला तिथे ‘प्रत्यक्ष मारुतिरायाच बसला आहे’, असे जाणवले. त्याच क्षणी ‘अंगावर शक्तीचा झोत आल्याने मी सूक्ष्मातून मागे ढकलले गेले’, असे मला जाणवले.’ (१२.१०.२०२१)

२ ई. श्री. बाळासाहेब विभूते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)

२ ई १. मारुतीच्या मूर्तीकडे पाहून शांतीची अनुभूती येणे : ‘मी मुख्य प्रवेशद्वारातून आत येत असतांना साधक ती मूर्ती बाहेर आणत होते. तेव्हा ‘ती हनुमंताची मूर्ती आहे’, हे मला ठाऊक नव्हते; पण ते दृश्य लांबून पाहूनच मला आनंद जाणवत होता; म्हणून मी तिथे जवळ जाऊन पाहिले, तेव्हा मला शांतीची अनुभूती आली.

२ ई २. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले रामनाथी आश्रमात एक आदर्श शिष्य म्हणून वास्तव्य करत आहेत. हनुमंताच्या मूर्तीसमोर उभे राहिल्यावर ‘ही त्यांचीच प्रतिकृती आहे’, असे मला जाणवले.

२ ई ३. मारुतीची नम्र, शांत आणि स्थिर मुद्रा पाहून माझ्या अंगावर शहारे आले.

२ ई ४. ‘प.पू. गुरुदेवांचेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच) दर्शन घेत आहोत’, याची प्रचीती येऊन माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझी ती अवस्था पुष्कळ वेळ टिकली.’ (१०.१०.२०२१)

२ उ. कु. महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

१. ‘हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतांना मला आनंद वाटला.

२. त्या मूर्तीमध्ये मला नम्रता आणि दास्यभक्ती जाणवली.

३. ‘त्या मूर्तीकडे पहात रहावे’, असे मला वाटले.’

(१२.१०.२०२१)

दासमारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दासमारुतीची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. या मूर्तीचे दर्शन घेतांना मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. अंजली कणगलेकर

१. दासमारुतीची मूर्ती पहायला जाण्यापूर्वी

अ. ‘दासमारुतीची मूर्ती पहायला जायचे’, या विचारानेच मला उत्साह जाणवू लागला. श्री. सत्यकामने (मुलाने) मला ‘पायी चालत जाऊया का ?’ असे विचारल्यावर मला नीट चालता येत नसूनही मी त्याला उत्साहाने ‘हो. चालेल’ असे सांगितले.

आ. मी सभागृहात प्रवेश करताच माझ्या आनंदात पुष्कळ वाढ झाली.

२. दासमारुतीच्या मूर्तीकडे पहातांना

अ. मी मूर्तीच्या जवळ जाताच आपोआप मनात मारुतिस्तोत्र म्हणू लागले आणि माझ्याकडून ते पूर्ण म्हटले गेले. त्या वेळी ‘मारुति लहान बाळासारखा हळूच पाहून स्मित करत आहे’, असे मला जाणवले. मारुतिस्तोत्र म्हणून झाल्यानंतर माझ्याकडून ‘मनोजवं…’ हा श्लोक आपोआप म्हटला गेला.

आ. ‘मारुति भावावस्थेत आहे. त्यामुळे त्याच्या भुवयाही आपोआप उंचावलेल्या आहेत’, असे मला जाणवले.

इ. त्याची बैठक पाहून ‘मारुति भावस्थितीत असूनही सतर्क आहे आणि आता तो उठून उभा रहील’, असे मला वाटले.

ई. मूर्तीतून भक्ती आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.

उ. ‘मूर्तीकडे पहातच रहावे’, असे मला वाटले. त्या वेळी ‘मूर्तीकारातील भाव किती उच्च कोटीचा असेल’, असा विचार माझ्या मनात आला.’

– सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०२१)