शिवमोग्गा (कर्नाटक) येथील सरकारी रुग्णालयात घुसून कुत्र्याने अर्भकाला ओरबाडून केले ठार !

शिवमोग्गा (कर्नाटक) – कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यातील  सरकारी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. येथे एका कुत्र्याने रुग्णालयात घुसून प्रसूती विभागातील एका नवजात अर्भकाला ओरबाडून बाहेर काढले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या वेळी कुणाचेही लक्ष कुत्र्याकडे गेले नाही. बाहेर सुरक्षा रक्षकाने पाहिले असता त्याने कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका केली; मात्र तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

संपादकीय भूमिका 

भटक्या कुत्र्यांची समस्या नागरिकांच्या मुळावर उठली असतांना ती सोडवण्यासाठी काहीही न करणारे जनताद्रोही प्रशासन !