माझ्या पूर्वजांनी भारतातून पाकिस्तानात येण्याची घोडचूक केली ! – पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी

पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांचे रोखठोक मत

पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील प्रसिद्ध पत्रकार आरजू काझमी यांनी केलेले ट्वीट सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे. यात त्यांनी ‘वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या काळात माझे पूर्वज उज्ज्वल भवितव्यासाठी भारतातील देहली आणि प्रयागराज येथून पाकिस्तानात आले; मात्र आता माझे भाऊ आणि कुटुंबातील अन्य सदस्य यांना वाटते की, पाकिस्तानात आमचे काहीच भवितव्य नाही. आमच्या आजोबांनी आमचे भविष्य बिघडवले.’

(सौजन्य : हिंदुस्तान टाईम्स)

मागील काही मासांपासून पाकमधील आर्थिक स्थिती अत्यंत बिघडली असून तेथे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आरजू काझमी यांनी हे ट्वीट केले. भारतीय वृत्तवाहिन्यांवरील अनेक चर्चासत्रांमध्ये काझमी यांचा सहभाग असतो.

आरजू काझमी यांना अनेक पाकिस्तान्यांकडून पाठिंबा !

काझमी यांच्या या ट्वीटला पाकमधील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेकांनी त्यांच्या त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. अफसान नावाच्या एका व्यक्तीने म्हटले आहे, ‘माझे आजी-आजोबा बिहार आणि उत्तरप्रदेश येथून पाकिस्तानात आले. त्यांना शेवटच्या श्‍वासापर्यंत त्यांच्या निर्णयाचा पश्‍चात्ताप होत होता.’ समीर अहमद नावाच्या अन्य एक पाकिस्तानी नागरिक म्हणाला, ‘मी तुमच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकतो. माझ्या आजोबांनीही हेच केले होते. अंततः आमची परिस्थिती बिकट झाली.’ यावर अनेक भारतियांनी आरजू काझमी यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले. (अशांना भारतात बोलावण्यासाठी भारत काही धर्मशाळा नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

भारतात रहाणार्‍या पाकप्रेमी मुसलमानांना याविषयी काय म्हणायचे आहे ? भारतातील पाकप्रेमी त्यांच्या पाकमधील धर्मबांधवांच्या साहाय्यासाठी पाकमध्ये गेल्यास पाकमधील समस्या सुटतील आणि त्याहून अधिक भारताचीही समस्या सुटेल !