केरळमध्ये प्रवाशाने रेल्वेला लावलेल्या आगीमध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू, तर ९ जण घायाळ
कोळीकोड (केरळ) – येथे अलाप्पुझा-कन्नूर एक्झिटीव्ह एक्सप्रेसमध्ये झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने रेल्वे गाडीलाच आग लावल्याची घटना घडली. यात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ९ प्रवासी घायाळ झाले. ही घटना २ एप्रिलला रात्री घडली. या घटनेनंतर कोळीकोड शहराजवळ कोरापुझा रेल्वे पुलावर गाडी पोचली असता प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली आणि रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. गाडीला आग लावणारा आरोपी पसार झाला आहे, तसेच आग लावण्यात आलेल्या डब्यातील एक महिलाही बेपत्ता असल्याचे समजले आहे. या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
सौजन्य हिंदुस्तान टाईम्स