पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही स्वतंत्र नगर परिषद करण्याचा अध्यादेश !
पुणे – राज्य सरकारने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही स्वतंत्र नगर परिषद करण्याचा अध्यादेश ३१ मार्च या दिवशी काढला आहे. पुढील ३० दिवसांमध्ये यावर नागरिकांच्या हरकती/ सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी त्या नगरविकास विभागाकडे पाठवतील आणि अंतिम अध्यादेशाद्वारे नवी नगर परिषद स्थापन केली जाईल. महापालिकेची सध्याची हद्द ५१६ चौरस कि.मी. असून त्यातील दोन्ही गावांची २८ चौरस कि.मी.ची हद्द वगळण्यात येईल.
या दोन्ही गावांतील इमारती, शाळा, भूखंड, तसेच पाणीपुरवठा आणि इतर योजना महापालिकेच्या कह्यात आहेत, त्या नव्या नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येतील; मात्र फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांतील असलेल्या कचरा डेपोची ६० हेक्टर जागा ही महापालिका हद्दीतच ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारच्या अध्यादेशानंतर या दोन्ही गावांतील नागरिकांनी भैरवनाथ मंदिरासमोर एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. फटाके फोडत पेढे वाटून आनंद व्यक्त केला.