मिरज येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रा !
१०३ वर्षे वय असलेल्या सावरकरप्रेमी आजींकडून घोषणांद्वारे इतरांना प्रेरणा
मिरज – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग, बलीदान, देशभक्ती यांचे स्मरण करून मिरज येथे २ एप्रिलला भाजपचे आमदार आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघालेल्या या यात्रेची मैदान दत्त मंदिर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर सांगता झाली.
या यात्रेत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री श्री. मकरंद देशपांडे, भाजपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक शिंदे, प्रा. मोहन वनखंडे, सर्वश्री श्रीकांततात्या शिंदे, ओंकार शुक्ल, जयगोंड कोरे यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होत
गौरव यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट दर्शवणारा चित्ररथ, २ अश्व, ‘मी सावरकर’, अशा लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी १०३ वर्षे वय असलेल्या वयोवृद्ध सावरकरप्रेमी आणि प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांची आजी श्रीमती इंदिरा भट यांनी उपस्थिती दर्शवून आणि घोषणा देऊन इतरांना प्रेरणा दिली.