पुणे येथील नरपतगिरी चौकातील साईबाबा मंदिरातून दानपेटीची चोरी !
पुणे – सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात असलेल्या श्री साईबाबा मंदिरातून ३१ मार्च या दिवशी चोरांनी दानपेटी चोरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरात श्रीरामनवमीनिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर चोरांनी दानपेटी चोरून नेली. दानपेटीत नेमकी किती रोकड होती, याविषयीची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांनी केलेले चित्रीकरण कह्यात घेतले असून साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाउत्सवांच्या दिवशी मंदिरांमध्ये चोरी होणे, हे हिंदूंची मंदिरे असुरक्षित असल्याचे द्योतक ! |