उन्हाळ्याच्या दिवसांत येणार्या थकव्यावर घरगुती उपचार
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १७५
‘उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे गळून गेल्यासारखे होते. थकवा येतो. त्यावर ३ वाट्या गव्हाचे पीठ चॉकलेटी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावे. हे पीठ थंड झाल्यावर यामध्ये १ वाटी पिठीसाखर नीट मिसळून घ्यावी. हे मिश्रण बरणीत भरून ठेवावे. यातील २ ते ४ चमचे मिश्रण थोड्याशा पाण्यात मिसळून प्यायल्याने लगेच तरतरी येते. मधुमेह असणार्यांनी साखर न घालता केवळ भाजलेले पीठ वापरावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०२३)