चैत्र एकादशीनिमित्त पंढरपूर येथे ५ लाख भाविकांची मांदियाळी !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – चैत्र एकादशीच्या निमित्ताने येथे ५ लाख भाविकांची मांदियाळी जमली होती. एकादशीच्या पहाटे श्री विठ्ठलाची नित्यपूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांनी, तर श्री रुक्मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्या अधिवक्त्या माधवी निगडे यांनी केली. यानंतर यात्रेला प्रारंभ झाला. या निमित्ताने पुणे येथील श्री विठ्ठलभक्त अमोल शेरे यांनी श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी यांच्या गाभार्यात मनमोहक फुलांची सजावट केली होती. चंद्रभागेत स्नान करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील भाविकही पंढरपूर येथे दर्शनासाठी आले होते.