देशात दिवसभरात कोरोनाचे ३ सहस्र ८२४ रुग्ण आढळले
नवी देहली – देशात दिवसभरात कोरोनाचे ३ सहस्र रुग्ण आढळले असून मागील १८४ दिवसांतील हा उच्चांक आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ सहस्र ३८९ एवढी झाली आहे. २ एप्रिल या दिवशी केरळ, राजस्थान, देहली आणि हरियाणा या राज्यांत प्रत्येकी १ रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडला. सद्यःस्थितीत केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांत कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. केरळमध्ये ४ सहस्र ९५३ रुग्ण असून महाराष्ट्रात ३ सहस्र ३२४ रुग्ण आहेत.