अमेरिकेतील अभिनेत्रीचे चुंबन घेतल्याप्रकरणी अभिनेता वरुण धवन याच्यावर टीका !
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता वरुण धवन याने ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या उद्घाटन सोहळ्यात अमेरिकेतील अभिनेत्री गिगी हदीद हिला उचलून घेतले आणि तिच्या गालांचे चुंबन घेतले. वरुणने तिला हाताला धरून व्यासपिठावर आणले आणि वरील कृत्य केले. त्यामुळे सामाजिक माध्यमांतून त्याच्यावर टीका होत आहे.
varun dhawan gigi hadid, are you kidding me? pic.twitter.com/2tAyMFMpCg
— Annesha (@ApnaaVarun) April 2, 2023
‘तुला चुंबन घेण्याची आवश्यकता होती का ?’, ‘हे करण्याआधी तू तिची अनुमती घेतली होती का ?’, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. ‘म्हणून भारतात वलयांकित व्यक्ती (सेलिब्रिटी) येण्यास इच्छुक नसतात’, असेही एकाने म्हटले. (नीतीमत्तेशी दुरान्वयाने संबंध नसलेल्या आणि असे कृत्य करून भारताची मान खाली घालायला लावणार्या अशा कलाकारांच्या चित्रपटांवर जनतेने बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक)