तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे निझामाचे ८वे वंशज, तर हैद्राबाद पोलीस रझाकारांचे सैन्य ! – आमदार टी. राजासिंह
भाग्यनगर (तेलंगाणा) – हैद्राबाद पोलिसांना केवळ मी करत असलेली वक्तव्ये आक्षेपार्ह वाटतात आणि ते माझ्या विरोधात गुन्हा नोंदवतात. तथापि मला प्रतिदिन देश-विदेशांतून मला मारण्याच्या धमक्या येत असतात, त्याचे सर्व पुरावे मी पोलीस महासंचालकांपासून आयुक्त अशा सर्वांकडे सुपुर्द करूनही कोणताही गुन्हा नोंदवला जात नाही. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे निझामाचे ८वे वंशज, तर हैद्राबाद पोलीस रझाकारांचे सैन्य आहे, असे रोखठोक प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले.
श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या वेळी टी. राजासिंह यांनी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याविषयी ते बोलत होते. या वेळी राजासिंह यांनी हा दावाही केला की, शोभायात्रेतून परतत असतांना मुसलमानबहुल चारमिनार परिसरात ओवैसी यांच्या समर्थकांनी भगवी वस्त्रे घातलेल्या हिंदूंवर आक्रमण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी केवळ नावाला तक्रार प्रविष्ट करून घेतली आहे.