मध्यप्रदेश सरकारने नसरुल्लागंजचे नाव पालटून केले भैरूंदा !
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील नसरुल्लागंज शहराचे नाव पालटून भैरूंदा केले आहे. याविषयीची सूचना सरकारकडून प्रसारित करण्यात आली आहे. सरकारने केंद्रशासनाकडे या संदर्भात प्रस्ताव पाठवला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अनुमतीनंतर नाव पालटण्यात आले आहे. यापूर्वी सरकारने भोपाळमधील इस्लामनगरचे नाव जगदीशपूर, तर होशंगाबादचे नाव नर्मदापूरम् केले होते.
Madhya Pradesh | Name of Nasrullaganj in Sehore district has been changed to Bhairunda. pic.twitter.com/6ylEBLNy6c
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 2, 2023