हिंदु समाजात द्वेष पसरवून भ्रष्ट राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधत आहेत ! – डॉ. डेव्हिड फ्रॉले, निर्देशक, इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक स्टडीज, अमेरिका
स्वातंत्र्यानंतर एका बाजूला हिंदुविरोधी प्रचार करणे आणि दुसर्या बाजूने साम्यवाद, इस्लाम अन् ख्रिस्ती धर्म यांच्या प्रचाराद्वारे भारताचे तुकडे तुकडे करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्यामुळे भारतातील समस्या पुष्कळ वाढल्या आहेत. जे भ्रष्ट राजकारणी आहेत, ते ढोंगीपणे उदार धर्मनिरपेक्ष आहेत. ते स्वतःची खुर्ची आणि सत्ता यांच्या लालसेने भारतीय हिंदु समाजाला जातीयवाद अन् धर्म यांच्या नावाखाली स्वतःची मतपेढी (व्होट बँक) वाढवण्यासाठी भडकावत आहेत आणि समाजात आपापसात द्वेष पसरवून ते भ्रष्ट राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधत आहेत. (साभार : मासिक ‘ऋषि प्रसाद’)