बंगालमध्ये भाजपच्या नेत्याची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिदिन उडत आहेत तीन तेरा !
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील आसनसोल-दुर्गापूर भागामध्ये भाजपचे नेते राजू झा यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. कोलकाता येथे चारचाकी गाडीतून जात असतांना झा हे येथील मिठाईच्या दुकानाजवळ थांबले असता काही जणांनी त्यांच्या गाडीची काच लोखंडी सळीद्वारे फोडली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. यात झा यांना ५ गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य २ जण घायाळ झाले. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
कोलकाता जा रहे बीजेपी नेता की कार पर अज्ञात हमलावरों ने चलाईं ताबड़तोड़ गोलियां, मौत#WestBengal #FiringonBJPleader #BengalBJPhttps://t.co/TbplAPN9D2
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) April 2, 2023
राजू झा हे कोळशाचे व्यापारी होते. यापूर्वी त्यांना कोळशाच्या तस्करीच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.