पालघर किनारपट्टीवरील बोटीत पाकिस्तानी नागरिक नसल्याचे स्पष्टीकरण !
पालघर – मुंबई आणि पालघर किनारपट्टीपासून ४४ नौटिकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीत कुणीही पाकिस्तानी खलाशी नसल्याचे उघड झाले आहे. याविषयीचे स्पष्टीकरण बोटीला अर्थसाहाय्य करणार्या ‘उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थे’ने दिले आहे.
‘जलराणी’ ही बोट उत्तनमधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. बोटीतील १५ खलाशांच्या आधारकार्डची पडताळणी केली असून त्यात कुणीही पाकिस्तानी नागरिक नाही. ही बोट मासेमारीसाठी गेली असून ती संपर्काबाहेर आहे. तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.