स्वातंत्र्यानंतर भारतियांच्या मानसिक गुलामगिरीचे इंग्रज पत्रकाराने केलेले मार्मिक विश्लेषण
मार्क टूली हे ‘बीबीसी’च्या वार्ताहर सेवेतून निवृत्त झाले. तेव्हा ‘बीबीसी’वर त्यांच्याशी वार्तालाप झाला. वार्तालाप करणार्या सूत्रसंचालकाने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही भारतात इतक्या वर्र्षांपासून काम करता आणि स्वातंत्र्यानंतर तुम्हाला काही पालट झाल्याचे दिसते का ?’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘भारतातून इंग्रजी राजवट गेली, तरी ती जिवंत आहे; कारण येथे कोणत्याही प्रांतातील व्यक्ती स्वतःच्या मातृभाषेत अस्खलीतपणे बोलू शकत नाही; कारण राष्ट्रीयत्वाच्या संस्कारांकरता येथे आग्रही भूमिका नाही. जर्मन आणि रशियन नेते विदेशात जातात. तेव्हाही ते आपल्या भाषेतच संवाद करतात. राष्ट्रीयत्वाचे संस्कार नसल्यामुळे या देशाचे गणितच चुकले असे वाटते.’’
– श्री. राजेश्वर पारवेकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ. (संदर्भ : ‘स्वातंत्र्यवीर’, जून २००५)